पुण्याच्या डॉ. पुंडे वुमन मिसेस युनिवर्स टोलरन्स

पुणे : साउथ कोरियाची राजधानी सेऊल येथे पार पडलेल्या मिसेस युनिव्हर्स २०२२ स्पर्धेमधे पुण्याच्या डॉक्टर प्रचिती पुंडे यांना वुमन मिसेस युनिवर्स टोलरन्स या पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेत विविध ९० देशातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत विविध स्तरावरील चाचण्यांमधून मिसेस युनिव्हर्स २०२२ या शीर्षकापर्यंत पोहोचावे लागते. या अतिशय अवघड आणि सर्वात जास्त कालावधी असलेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये अनेक देशाच्या सौंदर्यवती स्पर्धेतील टप्पे पार करत विविध उप आणि मुख्य शीर्षकापर्यंत पोहोचल्या.

या दरम्यान परीक्षकांकडून प्रत्येक स्पर्धकाचे परीक्षण चालू होते . स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले गेले होते. त्यातील त्यांची कामगिरी, स्पर्धकांचे एकमेकांबरोबरचे वर्तन, स्पर्धेतील एकूण वावर, विविध प्रकारचे पोशाख घालून केलेला रॅम्प वॉक, दिलेल्या विषया वरील वक्तृत्व कौशल्य अशा विविध कसोट्या पार करत विविध उप-शीर्षक जिंंकत ही स्पर्धा अजूनच चुरशीची होत गेली.

डॉ. प्रचिती स्वतः डॉक्टर असून एक जीवन प्रशिक्षक आहेत. आत्म निपुणता (सेल्फ मास्टरी) हा त्यांचा खास विषय आहॆ. हाच धडा देऊन त्यांनी हजारो महिलांना आत्म निर्भर केले आहॆ. त्यांनी शहरातील लोकांसाठी खास तयार केलेला स्व-निपुणता अभ्यासक्रम व त्यावरील लिखित नऊ पुस्तके, ग्रामिण भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी गेली अठरा वर्षे सातत्याने करीत असलेले कार्य, भारतात निर्मित केलेली घरगुती हिंसाचारावरील चित्रफीत या सर्व बाबींचा विचार केला गेला. शांतता ही एक मानवीशक्ती आहे, शांतवृत्तीवरील प्रश्नाचे उत्तर परीक्षकांच्या मनाला भावणा ठरले.

Sumitra nalawade: