“…तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबरही सुरू”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Sanjay Raut – सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “आधी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर ज्याप्रमाणे ईडीची कारवाई करून अटकेची भिती दाखवली, तोच प्रयोग आता राष्ट्रवादीबरोबरही सुरू आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते आज (13 एप्रिल) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं हे शिवसैनिकाचं वर्णन असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दाढीत शौर्य होतं. तसंच जर यांना दाढी असेल तर त्यांनी शौर्य दाखवलं पाहिजे. पण ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवलं.”

“त्यावेळी जे आमदार, खासदार निघून गेले त्यापैकी निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरून गेले आहेत, तसंच आता तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे”, असा आरोप राऊतांनी केला आहे.

Sumitra nalawade: