शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

ED detained Sadanand Kadam : माजी मंत्री व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ही कारवाई झाली असून ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडं रवाना झाल्याचं समजतं. ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी ईडीच्या पथकाने सदानंद परब यांची दापोलीतील त्यांच्या कुडेशी या गावी कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं असून सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. कदम यांना ताब्यात घेण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dnyaneshwar: