“काँग्रेस नेते राहुल गांधींना ईडी रोखू शकत नाही”

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीच नोटीस बजावण्यात आलं होत. त्यावरून काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं होत. तसंच आज राहुल गांधी हे ईडी कार्यालयात हजर रहाणार होते. तर सोनिया गांधी या कोरोना पॉसिटीव्ह असल्यामुळे त्यांनी ईडीकडून चौकशीसाठीचा वेळ वाढवून घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘हुकुमशाह कान उघडून ऐका, राहुल गांधी हे गांधी घराण्याचे वंशज आहेत. त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. सत्याच्या लढाईत तुम्ही कधीच राहुल गांधी यांच्याशी जिंकू शकत नाही, असं ट्विट देखील करण्यात आलं आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतं आहे.

तसंच हे प्रकरण नक्की काय आहे? यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडी बजावण्यात आलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र सुरु केलं होत. काही काळानंतर हे वर्तमानपत्र बंद पडलं. त्यानंतर सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीनं हे वतर्मानपत्राचे हक्क परत विकत घेतले होते. परंतु त्यांनी ही 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. तसंच याप्रकरणी पटीयाला हाऊस न्यायालयानं या दोघांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं.

Nilam: