शिवांजली शाळेत ‘शिक्षण परिषद’ संपन्न

पिंपळवंडी | शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी येथे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय ‘शिक्षण परिषद’ हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या प्रशिक्षण व गुणवत्तावाढीसंदर्भात हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा ठरला.

यावेळी चाळकवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख सर्वश्री काळे, जया गोर्डे, राजेंद्र फापाळे यांनी अध्ययन स्तर निश्चिती, पॕट परीक्षा मुल्यमापन व शैक्षणिक साहित्य पेटीचा वापर या विषयावर विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच यावेळी चाळकवाडी केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Rashtra Sanchar Digital: