पुणे : सोनाली बालवटकर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते “एज्युकेशन एक्सलन्स ॲवॉर्ड” प्रदान- (पुणे) शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिंघानिया एज्युकेशन, रेमंड ग्रुपतर्फे दिला जाणारा “एज्युकेशन एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२” सौ. सोनाली बालवटकर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवन, मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
बालवटकर या गेल्या पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच याअगोदरही त्यांना अनेक आंतरराष्ट्रीयपातळीवरील सन्मान मिळाले आहेत. सध्या त्या अक्षरा इंटरनॅशनल स्कूल वाकड, पुणे येथे प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अक्षरा स्कूलच्या अध्यक्षा सौ. ज्योती राठोर व संचालक जयेश राठोर यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.