खडसेंची शरद पवारांवर स्तुतीसुमने; म्हणाले…

जळगाव : माझ्यात क्षमता होती म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो, पोरीबाळीच्या नादी लागून हे होत नाही. पोरीबाळीच्या नादी लागून कुणी मुख्यमंत्री होत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहेे.

जळगावातील सभेत बोलताना खडसे म्हणाले की,  दोन वर्षपूर्वी मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणत होते. पवार यांची खिल्ली उडवत होते. मात्र शरद पवार यांनी एका रात्रीत चित्र बदलले. हे फक्त पवार करूच शकतात.

तसेच चांगलं काम कसं असतं हे बारामतीला गेल्यावर पाहायला मिळते.  शरद पवार यांच्यावर सर्वच पक्षातून प्रेम करणारे लोक आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व मी मान्य केले आहे. कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यावा हे त्यांच्याकडून शिकायला मिळते, असं म्हणत पवारांवर त्यांनी यावेळेस अगणित स्तुतीसुमनेही उधळले आहेत.

दरम्यान  मला स्वप्नांतही वाटत नव्हतं की हे तीन पक्ष एकत्र येतील.  पण पवारांनी ते करून दाखवलं, असंही खडसे यावेळेस बोलताना म्हणाले आहेत.

admin: