जळगाव : (Eknath Khadse On Girish Mahajan) जिल्हात नियोजन समितीच्या एका बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, यावेळी औषधांसाठी जिल्हा नियोजन निधिच्या खर्चातून खर्च करण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित केल्यानंतर गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जुंपली.
जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. या तिन्ही नेत्यामध्ये नेहमीच एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतात. त्याचे पडसाद जिल्हा नियोजनाच्या बैठकीतही दिसून आले. जळगावचे विकासकामे पुर्णत्त्वाकडे जातील असं नागरीकांना वाटले होतं, त्यामुळं त्यांचं लक्ष या बैठकीत लागलं होतं, मात्र शेवटी निराशाच पदरात पडल्याचं दिसून आलं.
सभागृहात अधिकाऱ्यांनी औषधीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबतचा प्रश्न मांडला. यावर एकनाथ खडसे जिल्हा नियोजन समितीतून औषधींसाठी निधी खर्च करण्याची गरजच काय? वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधींसाठी निधी का वापरले नाहीत? या औषधींचा खर्च का करु नये? औषधींसाठीचा हा निधी कोरोना काळातील आहेत का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित करत एकनाथ खडसेंनी सभागृहातील अधिकाऱ्यांना तसेच मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं.
याच मुद्द्यावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात तू तू मैं मैं झाली. तुमच्या घरातून कुठे पैसे जात आहेत, असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अखेर गिरीश महाजन यांनी कशा पद्धतीने औषधींसाठी पैसे खर्च करतात याची माहिती दिली. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत या विषयात मार्ग काढण्यात येईल असे सांगितलं. त्यानंतर हा विषय थांबला. मात्र या विषयामुळे सभागृहातलं वातावरण चांगलं तापलं होतं.