“माझ्यामुळे त्यांनाही पुण्य मिळालं, अर्ध पुण्य मला द्या शिंदेंची मागणी!

मुंबई : (Eknath Shinde On Ajit Pawar) अजित पवार म्हणाले, आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. मात्र, आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला? असे सोंग करायचे हे सर्व जनतेला कळतं ” असा सवाल अजित पवारांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना उपस्थित केला होता.

त्यावा उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “गणेशोत्सव काळात सगळीकडे जाण्याची सवय मला आधीपासून आहे. मी कालपर्यंत सगळे गणेशोत्सव, कार्यक्रम अटेंड करत होतो. आता अचानक मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बदललं तर लोक बोलतील कालपर्यंत हा बाबा बरा होता. आता बदलला. थोडा त्रास होतो मला. पण थोडं नियोजन करू आपण”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, यावेळी अजित पवारांना चिमटा काढताना मुख्यमंत्र्यांनी अर्ध पुण्य आपल्याला देण्याची विनंती केली. “मी फिरलो, त्यामुळे सगळ्यांना फिरायला लागलं. त्यांनाही पुण्य मिळालं. मी अजित पवारांना म्हणालो अर्ध पुण्य मला द्या”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Prakash Harale: