मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच, आता एकनाथ शिंदेंनी आता नवा डाव टाकला आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील गेली तीन महिने वाद सुरु आहे. त्यात आता शिंदेंनी एक नवीन दावा केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदावरही शिंदेंनी दावा केला आहे.
शिवसेना पक्षाविरुध्द बंड पुकारून एकनाथ शिंदेंनी 40 आमदार 12 खासदारांसह अनेक प्राथमिक सदस्य आपल्या पाठीशी असल्याचा देखील उल्लेख निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. यातून धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटानी केली आहे.