मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) बुलढाणातल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झालं आहे. वारंवार होणाऱ्या गद्दार आणि खोक्याचा ठाकरे ॲन्ड कंपनीचा जशास तसा हिसाब चुकता केला जाणार आहे. मातोश्रीतल्या फ्रिजचे खोके, मातोश्रीच्या कंपन्या, मोताश्रीचे व्यवहार आणि मातोश्रीची संपत्ती आता सगळंच काही बाहेर येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे ज्या भाषेत टीका करत आहेत आता त्याच भाषेत शिंदे गटाने उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, दीपक केसरकर यांच्या फ्रिजच्या खोक्याचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील हे प्रकरण पुढे वाढलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. ’50 खोके, एकदम ओके’ ही घोषणा मागच्या अधिवेशनात चांगलीच गाजली. पण आता फ्रीजच्या खोक्याने एन्ट्री घेतल्याने सगळीच गणित बदलली जाण्याची शक्यता आहे. आता हे खोके नेमके कसे आणि कधी गेले हे लवकरच बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांच्या उत्पन्नाच्या साधानावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना आदित्य ठाकरे या तर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदवर जाताना प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती पहिल्यांदाच जाहीर केली. त्यामुळे एवढी संपत्ती ठाकरे कुटुंबात कशी आली याचा शोध शिंदे गट घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गट उपकाराची परतफेड म्हणून मातोश्रीचा हिशोब चुकता करणार का? असा सवाल यामुळं उपस्थित होत आहे.