मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी स्वःताचे आयुष्य वाहून घेतलं. भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत त्यांनी सेना वाढीसाठी काम केलं. मात्र, त्यांच्याबाबतीत खूप मोठं राजकारण करण्यात आलं. आनंद दिघे यांच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या त्याचा मी स्वःता साक्षीदार आहे. काही गोष्टी मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. मी दिघे साहेबांविषयी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल.
याविषयी मी आज काही बोलणार नाही. पण जेव्हा समोरुन तोंड उघडले जाईल, तसे मला देखील त्या गोष्टींवर बोलावे लागेल. अन्यायाविरोधात पेटून उठण्यासाठी, आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे. त्यांचा मी शिष्य आहे. तेव्हा जास्तीचं बोलाल तर दिघेसाहेब यांच्यासोबत काय घडले, हे मी उघड करेन, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुचक धमकी वजा इशाराच दिला आहे. सुचक धमकी वजा इशाराच दिला आहे.
आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातो आहे. पण आम्ही गद्दार नाहीत. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे जात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करु असं बाळासाहेब म्हणाले होते, असा पुनरुच्चारही यावेळी शिंदेंनी केला आहे.