ठाकरेंना मोठा धक्का! अखेर ‘त्या’ बारा आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द!

मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या 40 आमदाराना सोबत घेऊन बंड पुकारत, भाजपच्या मदतीन नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयाला शिंदेंनी स्थगिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील ‘मविआ’ सरकारनं विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी पाठवली होती.

दरम्यान, शनिवार दि. 03 रोजी मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर आज आमदारांची यादी रद्द करण्यात आली असल्याचे पत्र राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. ठाकरे सरकारच्या या यादीला राज्यपालांकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून शिंदे फडणवीस सरकारकडून आता १२ आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवण्यात येणार आहे. यावर मात्र, राज्यपाल लवकर निर्णय घेतील असे दिसून येत आहे.

Prakash Harale: