एकनाथ शिंदे शिवसेनेला करणार जय महाराष्ट्र?

मुंबई : (Eknath Shinde On Shivsena Resigned) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेला जय महाराष्ट्र… ठोकणार का? अशी राजकीय वर्तूळात चर्चा रंगत आहे. जर शिंदे यांनी शिवसेनेला कायमचा रामराम ठोकला तर, हा शिवसेनेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तर शिवसेना फोडण्याचा आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आधीच शिजला होता, हे आता स्पष्ट होत आहे. असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे विधान परिषद निकाल लागल्यापासून शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचं समोर आलं आहे. ते सोमवार दि. २० रात्रीपासून सुरतमधील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी असल्याचं समजत आहे. तर त्यांच्यासोबत ३५ आमदार आहेत, असं गुजरात भाजप नेत्यांकडून सागंण्यात आलं आहे.

त्यानंतर भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. तर भाजपचं महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्सचं स्वप्न पुर्ण होणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणारआहे.

Prakash Harale: