मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं पहिलं ट्विट!

मुंबई :  राज्यात मागील ९-१० दिवसांपासून चाललेल्या सत्तासंघर्षाचा गुरुवार दि. ३० रोजी शेवट झाला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.

दरम्यान, राज्यपालांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा केली. त्यानंतर बोलताना बाळासाहेबांचे हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. 

भाजपाच्या साथीने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी बहुमताची ताकद दाखवत ही घोषणा केली आहे. 

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय आहे. त्याचबरोबर भाजपच्या जेष्ठ नेत्यांचे आणि सहकारी आमदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Prakash Harale: