मुंबई : (Eknath Shinde On Press Conference) बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत, आपल्या बंडखोर आमदारांना आवाहन करत म्हणाले, माझ्याचं लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर, मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे.
दरम्यान ते म्हणाले, तुम्ही समोर या बोला आणि माझा राजीनामा घेऊन राज्यापालांना द्या. माझी काही हरकत नसेल, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी माझ्यावर आक्षेप घेतला तर चालेल. पण माझ्या आमदारांनी आक्षेप घेतला या गोष्टीचा मला धक्का बसला आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर, मी माझा आजपासूनचा वर्षावरचा मुक्काम हालवून तो मातोश्री असेल.
एवढेच नाही तर, मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा देखील राजीमाना देण्यास तयार आहे. “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” या म्हणीचा आधार घेत मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला जे काय बोलायचं ते समोरासमोर येऊन बोला आणि काय ते सांगा. या सर्व आवाहनाला एकनाथ शिंदे कश्याप्रकारे प्रतिसाद देतात हे पहाणं महात्वाचं ठरणार आहे.