आरक्षणाशिवाय निवडणुका अशक्य; हसन मुश्रीफ

पुणे : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुण्यात झालेल्या ऐका कार्यक्रमात जोपर्यंत मागास प्रवर्गाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका घेतल्या जाणार नाहीत अशी घोषणा केली . हा कार्यक्रम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या स्थापनांना ६० वर्ष पूर्ण झाली यानिमित्त घेण्यात आला होता. तसंच हसन मुश्रीफ म्हणाले कि, पंचायतराज संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला पूर्ववत आरक्षण मिळावे म्हणून माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणासंबंधात इंपिरिकल डाटा जमा करण्यासाठी ही समिती स्थापन केली असून येणाऱ्या चार महिन्यांत आपल्याला आव्हाल मिळेल . तर येत्या ४ मे आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून जोपर्यंत आरक्षण मंजूर होणार नाही तोपर्यंत निवडणूक घेतल्या जाणार नसल्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

तसंच कायदा करून या निवडणुकीच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आहेत आणि जरी निकाल लागला तरीही पावसाळा तोंडावर आल्यामुळे सध्या तरी निवडणूक घेणं शक्य नसल्याचं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं . दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

Nilam: