XAI : आर्टिफिशिअल इटेलिजन्स अर्थात AI मुळं अवघ्या जगात मोठी तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होण्याच्या मार्गावर आहे. सर्वत्र सध्या याच तंत्रज्ञानाची चर्चा आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅप देखील आपलं स्वतंत्र एआय व्हजर्न लॉन्च करत आहेत.
त्यातच आता सोशल मीडियातील बडी कंपनी असलेल्या एक्सचा (ट्विटर) मालक इलॉन मस्कनं पहिल्या एआयची घोषणा केली आहे. उद्याच एक्सचं हे एआय लॉन्च होणार आहे.
इलॉन मस्कनं एक्सवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की, उद्या विशिष्ट गटासाठी एक्सचं एआय लॉन्च होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या एआय सॉप्टवेअरपैकी हे सर्वोत्तम एआय असेल असा दावाही मस्कनं आपल्या पोस्टमधून केला आहे.