’मॅसिकॉन २०२२’ राज्यस्तरीय परिषदेची उत्साहात सांगता

परिषदेचा द्देश साध्य झाल्याची भावना
या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण वातावरणात ज्ञानाचे आदान प्रदान करता आले विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाकरिता डॉ. डी वाय पाटील रुग्णालयातील जागतिक दर्जाच्या अद्ययावत शस्त्रक्रियागृहांबरोबर प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानासह येथील सेवा सुविधांचाही लाभ घेता आला तसेच अनुभवी तज्ज्ञांसोबत विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण ज्ञानाचा अभ्यास करून परिषदेचा एकंदर उद्देश साध्य झाल्याची भावना सहभागी शल्यचिकित्सकांनी व्यक्त केली.

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र व पूना सर्जिकल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मॅसिकॉन २०२२शल्य चिकित्सकांच्या ४४ व्या राज्यस्तरीय परिषदेची उत्साहात सांगता झाली. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया संदर्भात शल्य चिकित्सकांच्या ज्ञानाचे आदान प्रदान, पुनरावलोकन, नावीन्यपूर्ण शस्त्रक्रियांचे अध्ययन आणि विविध प्रकारच्या संशोधन लेखांचे सादरीकरण हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता. यासाठी १००० हून अधिक शल्य चिकित्सक महाराष्ट्राबरोबर देशभरातून प्रत्यक्ष व ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

परिषदे निमित्त आयोजित कार्यशाळेत पहिल्या दिवशी तब्बल ४५ शस्त्रक्रिया प्रख्यात सर्जनद्वारे करण्यात आल्या. यामध्ये अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया,एंडोस्कोपिक, लॅपरोस्कोपिक, कॉलोनोस्कोपी, ओपन शस्त्रक्रियांचा समावेश होता. अत्यंत दुर्मिळ व गुंतागुंतीच्या तसेच आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या जागतिक दर्जाच्याअद्ययावत ७ शस्त्रक्रियागृहातून याचे सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

यामध्ये महाराष्ट्रभरातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्यानंतर पुढील दोन दिवस शल्यचिकित्सा व शैक्षणिक विषयानुसार तज्ञांची व्याख्याने, सादरीकरण, मार्गदर्शन, परिसंवाद आदीचे आयोजन पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल मध्ये करण्यात आले होते.

Prakash Harale: