मुंबई : (Expansion the State Cabinet) सध्या आगामी निवडणूकींच्या पार्श्चभुमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा आणि लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली वारीमुळे राज्य मंत्रिमंडळाच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.
दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य आणि केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. मात्र, नवीन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे गटातील तीन अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. त्यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे सरकारची कोंडी होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे, संजय राठोड या मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत राहिलेल्या या मंत्र्यांचे पंख छाटण्याचे काम करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.