पुणे : (Export of Sugar News) गेल्या महिन्यांपासून सातत्यानं होणाऱ्या वातावरण बदलांमुळे (Climate Change) शेतपिकांवर मोठा परिणाम होत आहे. परतीच्या पाऊस (Rain Updates) लांबल्यामुळे अनेक पिकांवर परिणाम झाला आहे. तसेच, अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे, ऊस. यंदा बदलतं वातावरण पाऊस (Rain Updates) काळ जास्त झाल्याने ऊसाची (Sugarcane) वाढ पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम साखरेचा उत्पादनावर (Sugar Production) होणार आहे.
यावर्षी भारतामध्ये 20 ते 25 लाख टन साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. प्रति हेक्टर 15 ते 20 टन ऊसाचे उत्पादन कमी झाल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला (Sugar Export) केंद्र सरकारने बंधन लावली आहेत. साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या वर्षी इतकीच यावर्षी उसाची लागवड करण्यात आली होती. परंतु, यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे.
निसर्ग बदललाय, सततचा पाऊस आणि हवामानातील बदल यांमुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे हेक्टरी 15-20 टन साखर उत्पादन घटलं आहे. याचा परिणाम साखर 333 लाख टन किंवा त्यापेक्षाही कमी उत्पादन होऊ शकतं. गेल्या वर्षी हेच उत्पादन 357 लाख टन इतकं होतं. साखर उत्पादन जरी कमी झालं, तरी देशातील साखरेच्या दरांवर परिणाम होणार नाही. ऊस निर्यातीला मोठी मागणी आहे. परंतु, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधनं लादली आहेत. त्यामुळे आपली साखर जास्त निर्यात होणार नाही. देशात 275 लाख टन साखरेचा वापर इथेनॉलकडे 45 लाख टन साखरेचा वापर असं गृहीत धरलं तर देशात मुबलक साखर आहे.