मेटा कंपनीवर रेकॉर्डब्रेक १०,७६५ कोटींचा दंड, कारण ऐकून व्हाल थक्क

facebook Meta : फेसबुकची (Facebook) मुख्य कंपनी मेटावर (Meta) आजपर्यंतचा सर्वाधिक जवळपास १०,७६५ कोटी एवढा दंड बसला आहे. युरोपियन युनियनने (European Union) हा दंड ठोठावला आहे. मेटाला याधीही अनेकदा दंड बसलेला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेचा दंड याआधी कधीही बसलेला नाही. हे दंड बसल्याचे कारण ऐकून तुम्हीझी फेसबुक वापरकर्ते असाल तर नक्कीच सावध व्हाल.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms Inc. ला युरोपियन युनियन गोपनीयता नियामकांनी $1.3 अब्ज म्हणजेच सुमारे 10,765 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर देशांतील फेसबुक-इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा अमेरिकेत पाठवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Dnyaneshwar: