‘बाबरी मशिद पाडली त्यावेळी फडणवीसांचं वय…’; रुपाली ठोंबरेंचा निशाणा

मुंबई : रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बूस्टर डोस सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत टीका केली आहे. सध्या चाललेल्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन आणि भोंग्याच्या प्रकरणावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेत मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशार दिला आहे. सोबतच त्यांनी शरद पवारांवर देखील टीका केली. या संदर्आभात आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उडी घेतली असून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काही प्रवृत्तींकडून राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात अनेक वादग्रस्त मुद्दे आले आहेत. त्याबद्दल पोलीस चौकशी करत असून कारवाई केली जाईल असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. तसंच फडणवीस यांनी बाबरी मशिदीवेळी शिवसेना कुठे होती या वक्तव्यावर बोलताना म्हणाल्या की, बाबरी मशिद पाडली त्यावेळी फडणवीस यांचं वय काय होतं? असा सवाल त्यांनी यावेळी विचारत बोचरी टीका केली आहे.

Sumitra nalawade: