मुंबई : गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात राजकीय सभांचा पाढाच सुरु आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षातील नेते, राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकांचा चांगलाच भडका उडवला होता. त्यांच्या या टीकांना देवेंद्र फडणवीस आज सभा घेऊन उत्तर देणार आहेत. यासाठी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभेचं आयोजन केलं आहे.
सभेला नेमकेच सुरुवात झाली आहे. जय जय महाराष्ट्र माझा…या महाराष्ट्र गौरव गीतानं सभेला सुरुवात झाली. त्यानंतर सामुहिक हनुमान चालिसा पठणही झालं यामध्ये व्यासपीठावरील सर्व मान्यवरही सहभागी झाले होते.