टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचं निधन

मुंबई | Nitesh Pandey – टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 51व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. पण आता त्यांच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसला असून आणि संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

नितेश पांडे हे शूटिंगसाठी नाशिक येथील इगतपुरीजवळ गेले होते. पण काल (23 मे) रात्री त्यांचं हृहयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. याबाबतची माहिती नितेश यांचे मेहुणे निर्माता सिद्धार्थ नगर यांनी दिली आहे. तसंच त्यांच्या निधनानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, नितेश पांडे यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘ओम शांती ओम’, ‘खोसला का घोसला’, ‘दबंग 2’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘मंजिले अपनी अपनी’, ‘अनुपमा’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Sumitra nalawade: