मुंबई | Subi Suresh Passed Away – दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुबी सुरेश (Subi Suresh) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. अशातच आता मल्याळम अभिनेत्री (Malayalam actress) सुबी सुरेश Subi Suresh Passes Away) यांचं निधन झालं असून सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुबी सुरेश (Subi Suresh Passes Away) या 42 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या काही दिवासांपासून यकृतासंबंधित (Liver Disease) आजारानं त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कोची येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
सुबी यांना नृत्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी नृत्यांगणा म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केलं. तसंच प्रेक्षकांना त्यांची विनोदी शैली चांगलीच पसंतीस उतरली होती. अनेक कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ‘कुट्टी पट्टलम’ (Kutty Pattalam) कार्यक्रमातून त्या घराघरांत पोहोचल्या होत्या. त्या ‘गृहनाथन’, ‘एलसम्मा एन्ना आंकू’ या लोकप्रिय चित्रपटांत देखील झळकल्या आहेत.