चंदीगड | Singer Sidhu Moosewala Case | प्रसिद्ध गायक (Singer) आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला (Sidhu Moosewala) याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसे वाला याच्यावर मानसा येथे गोळी झाडण्यात आली असून या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसंच या धक्कादायक घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
काल पंजाबमधील आप सरकारने ४२४ जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोपर्यंत सिद्धू मुसे वाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात सिद्धू मुसे वाला याचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत. तसंच आता या हत्येमागील कारण समोर आलं आहे.
घटनेच्या तीन तासानंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने (Gangster Goldie Brarane) फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्विकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे. सर्व भावांना राम राम, सत श्री अकाल, मूसवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्रोई, लॅारेन्स बिश्रोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आज आम्ही घेतला आहे, असं गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.