सारा तेंडूलकर की सारा खान? शुबनमच्या चाहत्यांनी मैदानातच सुरू केली घोषणाबाजी

Shubnam Gill | गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर शुबनम गिल याच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या शुबनम गिलला (Shubnam Gill) हैदराबादच्या खोडकर चाहत्यांनी ‘सारा-सारा’ म्हणत चिडवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत. शुबनामला (Shubnam Gill) त्याचे चाहते विचारत आहेत की, कोण सारा, सारा तेंडुलकर (Sara tendulkar) की सारा अली खान (Sara Ali Khan). काही काळापूर्वी शुबमन गिल सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र त्यानंतर त्याला सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता की, शुभमन गिल नक्की कोणाला डेट करत आहे ?

त्या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, शुबनम सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी येत असताना, त्यादरम्यान तो प्रेक्षकांना अभिवादन करतो, तर मैदानावर उपस्थित काही खोडकर प्रेक्षक सारा-सारा म्हणून मोठ्याने ओरडू लागले.

Dnyaneshwar: