शेतकऱ्यांची कमाल! चक्क सोयाबीनपासून बनवले गुलाबजामून, जाणून घ्या सविस्तर

हिंगोली | Soybean Gulab Jamun – गुलाबजामून (Gulab Jamun) हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. गुलाबजामूनचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आपण आत्तापर्यंत दूधापासून बनवलेला खवा आणि साखरेचा पाक याच्या मिश्रणातून बनलेला गुलाबजामून खाल्ला असेल. मात्र, आपण सोयाबीनपासून बनलेला गुलाबजामून कधी खाल्लाय का? आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सोयाबीन गुलाबजामून काय प्रकार आहे? पण हे खरं आहे की, सोयाबीनपासून गुलाबजामून बनवण्याची भन्नाट आयडिया हिंगोलीतील (Hingoli) शेतकऱ्यांनी शोधून काढली आहे.

पानी फाऊंडेशननं (Panni Foundtion) यासंदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे. फार्मर कप स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) कळमनुरी तालुक्यातील कवडा, वारंगा मसाई, बेलमंडळ आणि सिंदगी या गावातले शेतकरी सहभागी झाले आहेत. या गावातल्या शेतकरी गटांनी चक्क सोयाबीनपासून गुलाब जामून बनवले आहेत. तेही अस्सल साजूक तुपातले. इतकचं नाही तर त्यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर, खवा असे पदार्थही तयार केलेत.

फार्मर कप या स्पर्धेत गटशेती बरोबरच शेतमालाचे मूल्यवर्धन करणे या गोष्टीला देखील प्रोत्साहन दिलं जातं. याचंच महत्व ओळखून कळमनुरी तालुक्यातील या शेतकरी गटानं सोयाबीनचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच पानी फाऊंडेशननं ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी या शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे.

Sumitra nalawade: