मोठी दुर्घटना! बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा | Buldhana Accident – बुलढाण्यामध्ये एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जवळपास 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. ही भीषण घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.

Sumitra nalawade: