राष्ट्र संचार न्यूज नेटवर्क
पुणे : गोपाळ कृष्ण गोखले पथ किंवा याचे प्रचलित नाव फर्ग्युसन कॉलेज रस्ता म्हणजेच राज्यभरात प्रसिद्ध असलेला एफ सी रोड चां अक्षरशः श्वास कोंडत आहे. वीकेंडसह काही महत्त्वाच्या दिवशी असणारी प्रचंड तरुणाईची गर्दी आणि या गर्दीत संपलेले फुटपाथ दुकानदाराने (footpath-shopkeepers) खाऊन टाकलेले पार्किंग तर व्यापाऱ्यांनी गिळंकृत केलेले फ्रंट साईड मार्जिन…! एकूणच एफसी रोड च्या सगळ्या रोमँटिक कथांना दृष्ट लागावी अशी अवस्था सध्या या रस्त्यावर आहे .
वास्तविक पाहता एफसी रोड हे तरुणाईची आवडते ठिकाण त्यामुळे सणसोलीसह शनिवार रविवार गर्दी चा येथे उच्चांक असतो परंतु हा रस्ता सध्या अतिक्रमण स्टॉल खोखी धारक आणि बेकायदेशीर व्यावसाय करणाऱ्या अनेकांनी अक्षरशः खाऊन टाकला आहे. येथे सणासूदीला, शनिवार रविवार (Saturday And Sunday) तर गर्दीचा उच्चांक असतोच पण इतर दिवशी देखील नागरिक व पर्यटकांनी रस्ता गजबजलेला असतो. ह्या रस्त्यावरच्या पदपथावरील अतिक्रमण, स्टॉल, खोकी टाकून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध शहरातील अनेक संस्था, संघटना, जागरूक पुणेकर, वृत्तपत्र सर्वांनी आवाज उठविला आहे. पाहणी केली असता पदपथा लगत भरपूर स्टॉल दिसून आले; हे कमी की काय तर बहुतांश इमारतींच्या साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग च्या जागेत व अन्यत्र पत्र्यांच्या शेड उभारून आतल्या आत भरपूर दुकाने थाटल्याचे निदर्शनास आले.
अगदी चिंचोळ्या जागेत फॅब्रिकेशन करून, लोखंडी जिने उभारून ही दुकाने थाटली आहेत. 2/3 ठिकाणी तर इतकी गर्दी आणि कच्ची शेड ठोकून तेथे फॅशन मार्केट ची उभारणी बघितली आणि अंगावर काटा आला. चुकून एखादा अपघात घडला तर कोणाच्याही वाचण्याची सूतराम शक्यता नाही.
ह्या सर्वांना मनपा ची परवानगी आहे का ? असल्यास कोणत्या नियमानुसार ? काही ठिकाणी जागा मालकाने सीमाभिंत म्हणून उभारलेल्या पत्र्यांवर कपडे लटकवून त्यावर व्यवसाय चालू आहे. माहिती घेतली असता ह्या स्टॉल धारकांचे प्रकरण म्हणे न्याय प्रविष्ट आहे.अश्या बाबतीत प्रशासन, मनपा चा विधी विभाग काय करतोय याची माहिती देखील उघड करावी ही विनंती.एफसी रोडच्या या अतिक्रणाबाबत मी यापूर्वी तीन वेळा आंदोलन आणि निदर्शने केली वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु अतिक्रमण करते आणि प्रशासन यांचे नाते एवढे घट्ट आहे की तेथे तात्पुरती कारवाई होते आणि पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न दिसून येतात.” असे भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) म्हणाले.
यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे काही जागरुक नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे त्याची तपासणी करण्याचे आदेश अतीक्रमण विभागाला देण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यातच त्यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार आहे, या कारवाईत कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी सांगितले.