मुंबई- Maharashtra Political Crisis : सध्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेलं आहे. अशात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी – कॉंग्रेस यांच्याकडून सरकार वाचवण्यासाठी शेवटच्या अटकली सुरु आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवसस्थानी महाविका आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत आणि सुनील केदार त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे नेते या बैठकीला नव्हते.
शिंदे गटाने केलेल्या बंडाचे पडसात संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. सर्वच पक्षांत घडामोडींना वेग आलेला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांत तर सरकार वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठकी सुरु आहेत. शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आहे. सरकार वाचवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबून पहायचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाचं आजो निकाल येईल त्या अनुरूप पुढील रणनीती आखण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
शरद पवारांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून पुढील योजना काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी हे शरद पवारांचे शेवटचे प्रयत्न समजले जात आहेत.