महापालिकेची नगरसेवक संख्या असणार १३९
एकूण प्रभागांची संख्या ४६, तर ११४ जागा सर्वसाधारण असतील
२२ प्रभागांतील जागा राखीव राहू शकतात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीनसदस्यीय पद्धतीनुसारची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. महापालिकेची १३९ नगरसेवक संख्या असणार आहे, तर ४६ प्रभाग राहणार आहेत. अनुसूचित जाती (एससी) साठी २२, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी असतील. अनुसूचित जातींसाठी संभाव्य २२ प्रभागांतील जागा राखीव राहू शकतात.
पिंपरी-चिंचवड : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ असणार आहे, तर अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सद्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी ४१, ४४ आणि ६ हे प्रभाग आरक्षित असतील. त्यातील ६ आणि ४४ या दोन प्रभागांत एससी, एसटी या दोन जागा राखीव राहतील. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील मोठी चुरस होईल.
अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सद्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ४४ आणि ६ हे आरक्षित असतील.
अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव प्रभाग
प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळे गुरव गावठाण, जवळकरनगर, वैदूवस्ती (अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ हजार ३३३)
प्रभाग क्रमांक ६: दिघी, बोपखेल गावठाण (अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ हजार ५७३)
प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर (अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ हजार १८) हे तीन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील.
संभाव्य ‘या’ प्रभागात अनुसूचित जातीसाठी २२ जागा राखीव
प्रभाग क्रमांक २९: भाटनगर, मिलिंदनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या १६ हजार ५०८)
प्रभाग क्रमांक १९: चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ११ हजार ५७१)
प्रभाग क्रमांक २२: ओटास्कीम निगडीगावठाण (अनुसुचित जातीची लोकसंख्या ११ हजार ४९५)
प्रभाग क्रमांक २०: काळभोरनगर, रामनगर, विद्यानगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ११ हजार ४८२)
प्रभाग क्रमांक ४३: दापोडी, गणेशनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ११ हजार १३४)
प्रभाग क्रमांक ११: इंद्रायणीनगर, बालाजीनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ८ हजार ९५०)
प्रभाग क्रमांक २४: मामुर्डी, किवळे, रावेत (अनुसूचित जातीची लोकसंख्या ८ हजार २३)
प्रभाग क्रमांक १८: मोरवाडी, मासुळकर कॉलनी, गांधीनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ७ हजार ९९९)
प्रभाग क्रमांक ४६: जुनी सांगवी, ममतानगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ७ हजार ९१९)
प्रभाग क्रमांक ३७: ताथवडे, पुनावळे, काळाखडक (अनुसूचित जातीची लोकसंख्या ७ हजार २०९)
प्रभाग क्रमांक ४४: पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ७ हजार ११)
प्रभाग क्रमांक १६: नेहरूनगगर, विठ्ठलनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ९५०)
प्रभाग क्रमांक ३४: बापूजीबुवानगर, अशोका सोसायटी (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ८७१)
प्रभाग क्रमांक ३९: पिंपळेनिलख, वेणूनगर, कावेरीनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ७४२)
प्रभाग क्रमांक ३५: थेरगाव, बेलठीकानगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ६६६)
प्रभाग क्रमांक २५: वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ३७५)
प्रभाग क्रमांक ६: दिघी-बोपखेल गावठाण (अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ हजार ८०)
प्रभाग क्रमांक १७: वल्लभनगर, एच ए कॉलनी, संत तुकारामनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या
६ हजार ३४२)
प्रभाग क्रमांक ३३: रहाटणी (अनुसूचित जातीची लोकसंख्या ५ हजार ९०८)
प्रभाग क्रमांक १४: यमुनानगर, कृष्णानगर, त्रिवेणीनगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ५ हजार ८१३)
प्रभाग क्रमांक ३: बोर्हाडेवाडी, जाधववाडी (अनुसूचित जातीची लोकसंख्या ५ हजार ७६३)
प्रभाग क्रमांक ३२: तापकीरनगर, ज्योतिबानगर (अनुसूचित जातीची लोकसंख्या ५ हजार ७०१)
हे २२ प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.