फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याचे गैरवर्तन, नियमांची उधळपट्टी

आळंदी | एका नामांकित फायनान्स कंपनीमध्ये वसुलीसाठी नियुक्त असलेल्या चाकणला राहणाऱ्या शरद पडवळ यांनी ग्राहकासोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे.

शरद पडवळ आळंदी-चाकण-मोशी-चरोली या भागात वसुलीचे काम करत असतात. मात्र, ते रात्री अपरात्री घरी येण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार एका ग्राहकाने केली आहे. त्यासंबंधित एक रेकॉर्डिंग देखील ग्राहकाने शेअर केली आहे. त्यामध्ये शरद पडवळ ग्राहकाला धमक्या देत असल्याचं दिसत आहे. ग्राहकाला आरे-तुरे केल्याचं देखील रेकॉर्डिंगमध्ये समजत आहे.

नियमानुसार रात्रीच्या वेळेत वसुलीसाठी ग्राहकाच्या घरी जाणे चुकीचे असते मात्र, शरद पडवळ रात्री साडेआठ वाजता घरी येण्याची धमकी देत आहेत.

Dnyaneshwar: