शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा

पिंपरी PCMC NEWS | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून उत्साही आणि आनंदी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात झाली. क्रांतिसूर्य जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शाळांच्या इमारती लहान बालकांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजल्या.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार महापालिकांच्या शाळेत पहिला दिवस हा शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित असणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पालकांचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्वागत केले, तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.

महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

खासगी शाळेत मोठ्या प्रमाणात फी आणि इतर खर्च करावा लागतो. त्या तुलनेत महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मोफत व दर्जेदार शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये ई-क्लास उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गात स्मार्ट टी. व्ही. संगणक आणि गणित कक्ष यांची सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.

Dnyaneshwar: