सरकराच्या घोषणा! मात्र, देशातील पहिलं अधारकार्ड प्राप्त करणाऱ्या ‘त्या’ महिलेची दिवाळी अंधारात…

नंदुरबार : (First woman to get Aadhaar card in the country) दिवाळीच्या तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारनं मोठ्या थाटात ‘आनंदाचा शिधा किट’ वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये आनंदाच्या शिधा पोहचू शकलेल्या नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातलं पहिलं आधार कार्ड प्राप्त करणारी महिला नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावातील रंजना सोनवणे या महिलेला आनंदाचा शिधा मिळाल्या नाही.

दरम्यान, रंजना सोनावणे यांच्यासह गावातील कोणत्याच व्यक्तीची दिवाळी गोड झाली नाही. त्यांच्या दारात दिव्यांना तेल नाही, घरात दिवाळीचा गोडवा नाही. यांच्यासाठी ही दिवाळी प्रकाश आणणारी नाही तर अंधार पाडणारी ठरली, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, या सर्व गोष्टींची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोनावणे यांच्या घरात महिनाभराचा किराणा देण्यात आला आहे.

राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळख असलेला आणि आनंदाचा शिधा किटची खरी गरज असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. या घोषणेमुळे सरकारने माध्यमांसमोर स्वःताचा उदो उदो करुन घेतला मात्र, तो फार काळ टिकला नाही. यामुळे हे सरकार फक्त घोषणा करणारे आणि आश्वासन देणारं आहे का? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित होताना दिसत आहे.

Prakash Harale: