अबब.. चक्क उडणारी बाईक ! आनंद महेंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एकदा पहाच

best catches fire in bandra mumbai 1best catches fire in bandra mumbai 1

मुंबई | गरज ही शोधाची जननी आहे, पेट्रोल, डिझेल, सीएनजीनंतर आता इलेक्ट्रिकवर उडणाऱ्या कार बाजारात येत आहेत. या गाड्या तुम्ही आकाशातही उडू शकता. जपानी स्टार्टअप कंपनी एरविन्स टेक्नॉलॉजीजने युनायटेड स्टेट्समधील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये फ्लाइंग हॉवरबाईक लॉन्च केली. जगातील पहिली उडणारी बाईक म्हणून ओळखली जाणारी, XTURISMO ही एक हॉवरबाईक आहे जी हवेत उडू शकते.

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. ज्यामध्ये एक माणूस उडत्या बाईकवर बसलेला आहे. हो तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की यासाठी 800 हजार डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येईल म्हणजेच अमेरिकेत सुमारे 6,50,00,000 भारतीय रक्कम.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “जपानी स्टार्टअपची उडणारी बाईक. अमेरिकेत सुमारे $800K खर्च येईल. मला शंका आहे की ती प्रामुख्याने जगभरातील पोलिस दल वापरेल; अनेक चित्रपटांमधील मनोरंजक चेस सीक्वेन्स. यासाठी देखील वापरले जाऊ शकते.” व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्याचा वेग 62 किलोमीटर प्रति तास असेल आणि ती 40 मिनिटे हवेत उडू शकते.

Dnyaneshwar:
whatsapp
line