मुंबई : (Food Prices Increases) दोन वर्षाच्या दिर्घ काळानंतर पहिल्यांदाच करोना विषाणूच्या निर्बंधाशिवाय यंदा दिवाळी साजरी केली जाणार आहे. मात्र, यंदा करोना विषाणूचं संकट जरी दूर झालं असलं तरी महागाई काही केल्या सर्वसामान्याच्या पाठलाग सोडताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्यांचे सरकार असल्याचे सांगत असले तरी, महागाईत कोणताही फरक पडताना दिसत नाही.
आता तोंडावर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर धान्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं जाणार हे निश्वित आहे. राज्यातील जनतेला शिंदे-फडणवीस मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र यानित्ताने त्यांच्या पुन्हा एकदा भ्रमनिराश हे दिसून येत आहे. यामुळे यंदाही सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता कमी आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, इंधनांचे वाढते दर आणि साठेबाजीमुळे ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या किमती वाढल्या आहेत. बाजारात ज्वारीचा दर २१ ते ३९ रुपये प्रति किलो असलेला हाच दर आता २८ ते ४५ रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचला आहे. बाजरीला १८ ते २५ रुपये प्रति किलो भाव होता, आता तो २४ ते ३५ रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. तर तांदळाच्या दरात किलोमागे 6 ते 10 रुपया पर्यंत वाढ झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरीकांचे दिवाळं निघणार आहे.