आजकाल प्रत्येकाला झणझणीत, स्वादिष्ट पदार्थ खायची चव सुटतेच. मग कुठे बाहेर फिरायला जाताना, सुट्टीच्या दिवशी किंवा घरातलं साधं जेवण जेवायचा कंटाळा आला की, खवय्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला बाहेर पडतातच. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बाहेरचे पदार्थ खाण्याची तलफ होतेच. तर असे खवय्ये एखाद्या प्रसिद्ध हॉटेलच्या शोधात असतात.
त्यामुळे अशा हौशी खवय्यांसाठी हॉटेल तारांगण प्रसिद्ध आहे. हॉटेल तारांगण हे अक्षय कोंडे यांचं हॉटेल आहे. तसंच हे हॅाटेल व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठी असून, या हॉटेलने खवय्यांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली आहे. हॉटेल तारांगण हे ८७, खेड शिवापूर-कोंढणपूर रोड, पुणे येथे आहे. तसंच हॉटेल तारांगणची स्पेशल मटण भाकरी, स्पेशल चिकन भाकरी, चिकन थाळी, मटण थाळी, चिकन सूप, मटण सूप, चिकन तंदुरी, पनीर टिक्का, स्पेशल काजू करी, आलू मटर, मटर पनीर, पालक पनीर, जिरा राइस, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी असे अनेक स्वादिष्ट, झणझणीत पदार्थ या हॉटेलची खासियत आहेत.
तसेच या हॉटेलने आपल्या पदार्थांची चव कायम ठेवल्याने येथे खवय्यांची गर्दी झालेली मोठ्या प्रमाणात दिसते. विशेष म्हणजे हॉटेल तारांगणमध्ये बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे या हॅाटेलकडे खवय्ये नेहमी आकर्षित होतात. तसंच या हॅाटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडणारे आहेत. सोबतच तारांगण हॅाटेलचे आदरातिथ्य खवय्यांना पुन्हा पुन्हा तेथे येण्यास भाग पाडते.
तर तुम्हाला स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा सुट्टीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत टाइम स्पेंड करायचा असेल, पार्टी करायची असेल तर आवर्जून तारांगण हॅाटेलला भेट द्या.