छोले भटूरे… नाव जरी ऐकलं, तरी तो पदार्थ खाल्ल्याशिवाय राहावत नाही. छोले भटूरे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच आवडता पदार्थ आहे. याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये कितीही लांबचा प्रवास करायला तयार असतात. पावसाळ्याचे दिवस सध्या सुरू असून, या दिवसांमध्ये छोले भटूरेचा आस्वाद घेणं म्हणजे मन तृप्तच झाल्यासारखे आहे. तर अशाच खवय्यांसाठी जोगी के छोले भटूरे हा कॅफे प्रसिद्ध आहे. या कॅफेने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
जोगी के छोले भटूरे हे शरद पांडे यांचं कॅफे आहे. हे प्रसिद्ध कॅफे पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील अजमेरा हाऊसिंग सोसायटी, मोरवाडी येथे आहे. जोगी के छोले भटूरे या कॅफेत मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून प्रत्येकाच्याच खिशाला परवडतील याच दरात मिळतात. तसेच या कॅफेचं आदरातिथ्य आणि त्यांची कायम ठेवलेली पदार्थांची चव यामुळे येथे खवय्ये मोठ्या प्रमाणात येत असतात.
जोगी के छोले भटूरे या कॅफेची स्पेशल छोले भटूरे, छोले राईस, आलू पराठा, गोबी पराठा, पनीर पराठा, तवा पुलाव, गुलाबजामून, गुलाबजामून विथ आइस्क्रीम, स्वीट लस्सी, राजमा चावल असे अनेक पदार्थ त्यांची खासियत आहे. पुणेकर म्हटलं, की त्यांना दर्जेदार चवीचे पदार्थ खायला आवडतातच. तर अशाच हौशी खवय्यांसाठी जोगी के छोले भटूरे हे कॅफे प्रसिद्ध आहे. तुम्हालाही पार्टी करायची असेल, स्वादिष्ट छोले भटूरे आणि अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आवर्जून जोगी के छोले भटूरे या कॅफेला भेट द्या.
पत्ता – अजमेरा मोरवाडी, अजमेरा हाऊसिंग सोसायटी, कॉम्प्लेक्स, पुणे