मुंबई – शिवसेनेच्या 35 पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिवसेनेच्या या बंडामागे भाजपचा हात असल्याचं चर्चा आहेत. भाजपशासित राज्य आसाममधील गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये आमदार आहेत. मात्र अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी बंडाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
हे बघा, हे सगळं जे कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे. दर दिवसाआड विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, अमित शहांना भेटतात, नड्डांना भेटतात, आणखी कुणाला भेटतात…पुढची रणनीती आखत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ईडीचं काय करायचं? कुणावर कसा दबाव टाकायचा? त्यानंतर साधनसामग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसाला हे सुरू आहे. त्यामुळे याचा सूत्रधार कोण आहे? याचा कर्ता करवीता कोण आहे? हे आता स्पष्ट झालं असल्याचं चव्हाण म्हणाले.