IPLचे माजी अध्यक्ष आणि देशातून फरार असलेले ललित मोदीं सध्या कुटुंबीयांसोबत पिकनिकवर गेलेले आहेत. मालदीवरुन ते नुकतेच इंग्लंडला परतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी आपल्यासोबत प्रसिध्द अभिनेत्री सुश्मिता सेन देखील असून आम्ही नवीन आयुष्याची सुरुवात केलीआहे असं ट्विट करून तयंनी सांगितलं. आणि सुश्मिता सोबतचे फोटोही शेअर केले.
ट्विट मध्ये त्यांनी ‘मालदीव वरून नुकताच लंडनला परत आलो. सोबत कुटुंबीय देखील आहेत. सांगायचं म्हणजे माझी बेटरहाफ सुश्मिता देखील सोबत आहे. आणि अखेर आम्ही नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे’. असं सांगितलं मात्र फक्त सातच मिनिट झाले असता त्यांनी अजून एक ट्विट केलं आणि पलटीच मारली.
पहिल्या ट्विटनंतर ललित लग्नाच्या शुभेच्छा यायला लागल्या. आणि अनेक प्रश्नही चाहत्यांकडून विचारण्यात आले. त्यानंतर काहीच मिनिटांनी त्यांनी अजून एक ट्विट करत ‘आम्ही अजून लग्न केलेलं नाही. सध्या फक्त एकमेकांना डेट करतोय मात्र लवकरच लग्नही करू’ अशी माहिती दिली.