श्रीलंका : श्रीलंकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेलिकॉप्टरने नौदल तळाकडे हलवण्यात आले आहे. यांनी सोमवारी राजीनामा दिल्यापासून देशात हिंचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
काल श्रीलंकेतील हंबनटोटा येथे संतप्त आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या घराला आग लावली होती. या हिंसाचारात जवळपास २०० जण जखमी झाले असून एका खासदाराचाही मृत्यू झाला आहे. राजपक्षे यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चकमकी सुरू आहेत.
श्रीलंकेतील सगळ्याच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यता आली आहे. श्रीलंकेतील तणावपूर्ण परिस्थिती हताळण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.