शेतकऱ्यांमागचे विघ्न संपेना! जास्तीच्या पावसाने पिकं गेली, आता कडाक्याच्या थंडीमुळे फळबागांचे नुकसान!

मुंबई : (Formers On Maharashtra State Government) महिना भरापुर्वी परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्ठीमुळे शेती पिकांच्या नुकसानामुळे होरपाळून निघालेल्या शेतकऱ्यांना आता आणखी एकदा कडाक्याच्या थंडीमुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याने याचा परिणाम फळ पिकांवर होणार आहे. कडाक्याची थंडीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पपई आणि केळीचा बागांची काळजी घेतली पाहिजे. 

दरम्यान, राज्यभरातील तापमानाचा पारा घसरला आहे. तापमानाचा पारा घसरला असून दहा अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. तर सातपुड्याच्या डोंगररांगांमधील तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कमी होणाऱ्या तापमानाचा जसा परिणाम मानवी जीवनावर होत आहे तसाच परिणाम फळबागांवरही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात शेतकऱ्यांचं परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं. या पावसाचा सर्वात मोठा फटका पपई तसंच केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. आता थंडीचा परिणाम देखील पपई पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभं राहिलं असून मोठ्या नुकसान भरपाईला समोर जाण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे.

Prakash Harale: