नेत्र तपासणी शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धन्वंतरी क्लिनिकतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर

पुणे : आदित्य फाउंडेशन व डॉक्टर दूधभाते नेत्रालय आणि रेटीना सेंटर तसेच धन्वंतरी क्लिनिक यांच्या विद्यमाने रविवारी (दि. ७) रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गेली अनेक वर्ष पुणे शहरात डॉक्टर दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटर हे फिरता डोळ्यांचा दवाखाना म्हणून कार्यरत आहे. या सेंटरमध्ये डोळ्या संबंधित वेगवेगळे उपचार केले जातात. या ठिकाणी डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी व इतर तपासणीसाठी अध्ययावत यंत्रसामग्री आहे. यांची खासियत पाहून जाधवनगर (वडगाव बुद्रुक) येथील धन्वंतरी क्लिनिकने रविवारी आपल्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी आयोजित केले होते. या शिबिरास जवळपास ९० ते १०० लोकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली.

धन्वंतरी क्लिनिकच्या डॉक्टर करिष्मा मुल्ला म्हणाल्या की, जाधवनगर परिसरात सामान्य लोकांची संख्या अधिक आहे. त्यांना डोळे तपासणी करण्यासाठी शे पाचशे रुपये द्यावे लागतात. पाचशे रुपये देणे त्यांना कठीण आहे. याचा विचार करून मी आज मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवले होते. या शिबिरास येथील लोकांनी प्रतिसाद दिला. इथून पुढे दर महिन्याला नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, साखर, रक्त-लघवी तपासणी अशा अनेक तपासण्या मोफत करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुसार महिन्यातून एकदा मोफत असे शिबिर घेतले जातील.

Prakash Harale: