लालबाग राजाच्या मंडपात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | Lalbaugcha Raja Clash Video – सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईचा प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) मंडपात भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. यादरम्यान काल मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे राहिले होते. यावेळी भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी मंडपामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

Sumitra nalawade: