पुणे ः ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे पुणे शहरात महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्सपोर्टसाठी (एमएसआरटीसी) पहिली इंटरसिटी ई-बस १ जून पासून धावणार आहे. इंधनबचतीचा प्रभावी उपाय म्हणून राज्यातील एसटीच्या ताफ्यात आता ई-बस अंतर्भूत करण्यात येत असून, पहिल्या दोन ई-बस दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
- पूर्ण वातानुकूलित
- एका चार्जिंगमध्ये २५० कि.मी. धाव
- एलईडी स्क्रीनची सोय
- आत व बाहेरच्या बाजूला कॅमेरे
- १२ मीटर लांब, ४ मीटर रुंद
- ४५ आसन क्षमता
- री जनरेट ब्रेकिंग सिस्टिम
- दोन कोटी रुपयांची बस
- ग्रीनसेल मोबिलिटी
- ग्रे रंग, लाल रंग, काळ्या रंगात
या ई-बससाठी पुणे विभागीय परिवहन मंडळाच्या कार्यालय परिसरात ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक एसटीची बस ‘शिवाई’ या नावाने पहिला प्रवास करणार आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे राज्यातील पहिली एसटीसुद्धा पुणे-अहमदनगर याच मार्गावर १ जून १९४८ मध्ये धावली होती.
आता ७४ वर्षांनंतर पुन्हा त्याच मार्गावर राज्यातली पहिली ई-बस प्रवास करणार आहे. पुणे-नगर मार्गावरील धावेनंतर लवकरच पुणे-मुंबई, पुणे-कोल्हापूर या मार्गांवरही ई-बस महिन्याभरात धाव घेईल. पुण्याचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी तब्बल चार किलोमीटर लांबीची केबल टाकण्यात आली आहे. प्रदूषणाची समस्या आणि इंधनाचे आकाशाला भिडलेले दर, यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असताना, एसटी महामंडळाकडून काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे.