मुंबई – Ajit Pawar on Fund | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राष्ट्रवादी आहे. सरकार टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मी निधी वाटपात कधीही दुजाभाव केला नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यामध्ये भाजपचा हात दिसत नसल्याचं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी निधी वाटपाच्या दुजाभावाचा आरोप फेटाळला असला तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिल्याचं पटोले म्हणाले