मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार; गृहमंत्री शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित

पुणे | Madan Das Devi – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी (Madan Das Devi) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहीनीमध्ये सकाळी 11.50 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

मोतीबाग येथे मंगळवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळींनी अंत्यदर्शन घेतले.

मोतीबाग येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांची अंत्ययात्रा 11 वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत काढण्यात आल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

admin: