जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू बलात्कार प्रकरणात पुन्हा दोषी सिद्ध! उद्या होणार शिक्षेची सुनावणी

New Delhi : आसाराम बापूंच्या (Asaram bapu) अडचणी वाढणार आहेत. 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून उद्या त्यांना शिक्षा जाहीर होणार आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले. अशा स्थितीत एकाला दिलासा तर दुसऱ्याला मोठा धक्का बसला आहे. (Gandhinagar court convicts godman Asaram Bapu in woman disciple rape case)

2013 च्या प्रकरणात आसाराम यांच्यावर सुरतच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा नारायण साईवर (Narayan Saai) याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम यांच्याव्यतिरिक्त त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत. तसेचं आज सुनावणीदरम्यान आसाराम बापू यांना ऑनलाई न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर कोर्टाने त्यांना दोषी ठरवले पण शिक्षेची घोषणा केली नाही. शिक्षेबाबत उद्या निर्णय दिला जाईल, असे सांगण्यात आले.

आसाराम बापू याआधीच दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सध्या ते जोधपूर कारागृहात बंद आहे. तसेच, याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसाराम बापूंच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम म्हणाले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसे केले नाही.

Dnyaneshwar:

View Comments (0)